E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ ,देश
भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर
Wrutuja pandharpure
26 May 2025
जपानला मागे टाकून पटकावले स्थान
नवी दिल्ली : भारत जगातील चौथी आर्थिक महासत्ता बनला आहे. जपानला मागे टाकून भारताने ही झेप घेतली आहे, अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिली.
नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेची दहावी बैठक संपल्यानंतर याबाबतची माहिती सुब्रमण्यम यांनी दिली. परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एकूणच भूराजकीय आणि आर्थिक वातावरण भारताच्या दृष्टीने पोषक आहे. देश जगातील चौथी आर्थिक महासत्ता झाला असून अर्थव्यवस्थेने ४ ट्रिलीयन डॉलर्स एवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार भारत जपानपेक्षा अर्थव्यवस्थेत अधिक मोठा झाला आहे. ते म्हणाले, अमेरिका, चीन आणि जर्मनी हे जागतिक अर्थव्यवस्थेत पहिल्या तीन क्रमांकावर असून जर्मनीनंतर भारताचा चौथा क्रमांक आहे. येत्या अडीच ते तीन वर्षांत भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूकने एप्रिलमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात २०२५ मध्ये (आर्थिक वर्ष २०२६) ४.१९ ट्रिलियन डॉलर्सच्या विकासासह भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था होईल, असे नमूद केले होते. जी सर्वसाधारण विकास (जीडीपी) ४.१८७ अब्ज डॉलर्स जो जपान एवढा होईल, असा अंदाज वर्तविला होता.
भारताचे दरडोई उत्पन्न दुप्पट होत २ हजार ८८० डॉलर्स २०२५ मध्ये होईल.२०१३ ते २०१४ मध्ये ते १ हजार ४३८ डॉलर्स एवढे होते. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात विकास दर ६.२ टक्के एवढा २०२५- २०२६ मध्ये ६.५ टक्केवरुन घसरेल, असेही म्हटले होते. ग्रामीण भागांतील खासगी खर्चाचा विचार करुन या वर्षी विकास दर ६.२ टक्के राहील. अहवालानुसार जागतिक विकास या वर्षी २.८ टक्के होता. जो अपेक्षित धरल्याच्या अर्धा टक्के कमी झाला आहे. पुढील वर्षी जागतिक विकास दर ३ टक्क्यांच्या आसपास असेल, असा अंदाज आहे.
अर्थव्यवस्था (जीडीपी)
अमेरिका :३०.५१ लाख कोटी डॉलर्स
चीन : १९.२३ लाख कोटी डॉलर्स
जर्मनी : ४.७४ लाख कोटी डॉलर्स
भारत : ४.१९ लाख कोटी डॉलर्स
जपान : ४.१९ लाख कोटी डॉलर्स
दरडोई उत्पन्न
अमेरिका : ८९.११ हजार डॉलर्स
चीन : १३.६९ हजार डॉलर्स
जर्मनी : ५५.९१ हजार डॉलर्स
भारत : २ हजार ८८ डॉलर्स
जपान : ३३.९६ हजार डॉलर्स
Related
Articles
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाची विजयी सलामी
06 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाची विजयी सलामी
06 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाची विजयी सलामी
06 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाची विजयी सलामी
06 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर